बंगळुरु | कर्नाटक राज्य सरकारची बस माकडाच्या हाती, चालकाचं निलंबन
सध्या एक माकडाचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होतोय. या माकडानं चक्क एसटीमध्ये चालकाच्या समोर बसुन स्टेअरिंग हाती घेतल्याचं पाहायला मिळत आहे. कर्नाटक सरकारची ही बस असून, प्रवाशांच्या जीवाशी खेळल्याबद्दल कर्नाटक सरकारनं बस ड्रायव्हरवर निलंबनाची कारवाई केलीय.