कर्नाटक निकाल: फोडाफोडी टाळण्यासाठी काँग्रेसकडून आमदारांसाठी रिसॉर्ट बूक

Continues below advertisement
बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आता भाजपनं फोडाफोडीचं राजकारण सुरु केल्याचा गंभीर आऱोप काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केलाय.
काही आमदारांना मंत्रिपदाची तर काहींना पैशांची लालूच दाखवली जातेय. मात्र अशा प्रलोभनांना बळी न पडणाऱ्यांना भाजपनं थेट आयटी आणि ईडीच्या धाडी टाकण्याची धमकी दिल्याचंही काँग्रेसनं म्हटलंय.
कर्नाटकात भाजपला सर्वाधिक म्हणजे 104 जागा मिळाल्यात. मात्र बहुमताचा आकडा पार करण्यासाठी त्यांना अजूनही 7 आमदारांची गरज आहे.
तर तिकडे काँग्रेसला एकूण 78 जागा मिळाल्यात. तर जेडीएस 38 जागांवर आहे. मात्र काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन करण्यासाठी मोकळीक दिलीय. त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसकडे मिळून 116 आमदारांचं बळ आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram