कर्नाटक : कावेरी नदीच्या पाण्यात एक जण वाहून गेला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कर्नाटकातल्या म्हैसूरमध्ये एक व्यक्ती कावेरी नदीच्या पुरात वाहून गेला आहे. इथल्या चनचानकट्टे या धबधब्याजवळ काही लोक फिरायला गेले होते. जोरदार पावसामुळे नदीचं पाणी अचानक वाढलं आणि यामध्ये चार लोक वाहून गेले. मात्र स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न करुन यातल्या तिघांना वाचवलं. मात्र एका व्यक्तीला ते वाचवू शकले नाही. हा व्यक्ती वाहून जातानाचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. ज्यामध्ये हा व्यक्ती वाहून जाताना दिसत आहे.