कौल कर्नाटक : येडीयुरप्पांचा सत्तास्थापनेचा दावा, उद्या शपथविधी?
Continues below advertisement
कर्नाटकात सत्ता स्थापनेचा दावा भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार बीएस येडियुरप्पांनी राज्यपालांकडे केला आहे. यावर आता राज्यपाल वजुभाई वाला काय निर्णय देतात, याची प्रतीक्षा असल्याची प्रतिक्रियाही येडियुरप्पांनी राज्यपालांना भेटीनंतर दिली.
येडियुरप्पा उद्याच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दुसरीकडे मात्र भाजपचेच सहा आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा कर्नाटकातील काँग्रेस नेते एम.बी.पाटील यांनी केला. काँग्रेस-जेडीएस आपल्याकडे बहुमत असल्याच्या दाव्यावर ठाम आहे, त्यामुळे राज्यपाल काय भूमिका घेतात आणि कर्नाटकात नेमकं कोण सत्तेत येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
भाजपला राज्यपालांनी सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएससमोर काय पर्याय असेल, हा स्वाभाविक प्रश्न आहे. काँग्रेससमोर सुप्रीम कोर्टात जाण्याचा मार्ग आहे. शिवाय सर्व आमदार घेऊन राज्यपालांची भेट घेण्याचाही पर्याय काँग्रेससमोर आहे.