कर्नाटक सत्तासंघर्ष : सुप्रीम कोर्टात नेमकं काय झालं?

Continues below advertisement
कर्नाटकमध्ये सरकार बनवण्यासाठी भाजपला आमंत्रण देणाऱ्या राज्यपालांच्या निर्णयाला काँग्रेसने थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आणि त्या याचिकेवर मध्यरात्री सुनावणी झाली. भाजपच्या बी एस येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यावर स्थगिती आणावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने येडीयुरप्पांच्या शपथविधीवर स्थगिती आणण्यास नकार दिला.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 104 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा ठरला आहे. मात्र काँग्रेस (78) आणि जेडीएस (38) या दोन पक्षांनी निवडणुकीनंतर एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या एकूण जागांचा आकडा 116 वर पोहोचला आहे. काँग्रेस-जेडीएस युतीनेही सरकार बनवण्यासाठी राज्यपालांकडे दावा केला आहे.

रात्री 2 वाजण्याच्या सुमारास सुप्रीम कोर्टात काँग्रेसच्या याचिकेवर सुनावणी झाली. काँग्रेसकडून अभिषेक मनुसिंघवी, केंद्र सरकारकडून अॅटर्नी जनरल वेणुगोपाल, तर भाजपकडून माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram