नवी दिल्ली : येडियुरप्पांचा उद्या फैसला, प्रकाश जावडेकर आणि राहुल गांधींचं ट्विट

Continues below advertisement

कर्नाटक विधासनभेत उद्याच बहुमत सिद्ध करा, असा थेट आदेश सुप्रीम कोर्टाने भाजप आणि कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना दिलेत,
कर्नाटक निवडणुकीतील नाट्यमय घडामोडींबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. न्यायमूर्ती ए. के. सिक्री, न्या. अशोक भूषण आणि न्या. बोबडे या तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते आणि विधीज्ञ अभिषेक मनू सिंघवी, भाजपकडून मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं उद्या 4 वाजता बहुमताची चाचणी घ्या, असा आदेश दिला आहे. त्यामुळे आता भाजपाला बहुमत टिकवण्यासाठी आमदारांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.
दरम्यान राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांचा अवधी दिला होता. भाजपाकडे पुरेसं संख्याबळ नसल्यानं या दिवसांमध्ये घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात होती. या प्रकरणी काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर आज सुनावणी झाली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram