कर्नाटक सीएम रेस: सुप्रीम कोर्टात पहाटे पाचपर्यंत सुनावणी, येडियुरप्पांच्या शपथविधीला हिरवा कंदील!
Continues below advertisement
येडीयुरप्पांच्या शपथविधी सोहळ्यावरुन मध्यरात्री सुप्रीम कोर्टात झालेल्या ऐतिहासिक सुनावणीत काँग्रेसला झटका बसला आहे. सुप्रीम कोर्टानं शपथविधी रोखण्यास स्पष्टपणे नकार दिलाय. राज्यपालांनी येडीयुरप्पांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण देताच काँग्रेसनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यामुळे चक्क रात्री सव्वा दोन ते तब्बल पहाटे साडे पाच पर्यंत कोर्टात ऐतिहासिक सुनावणी झाली. आमदारांची संख्या काँग्रेस आणि जेडीएसकडे जास्त असताना
राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेचं आमंत्रण देणं, गैर असल्याचं काँग्रेसनं म्हटलं. यावर एखाद्या पक्षाला सत्तास्थापनेचं निमंत्रण देणं राज्यपालांचा विशेषाधिकार आहे, असं म्हणत कोर्टानं यात हस्तक्षेपास नकार दिला.