कौल कर्नाटकचा : भाजपकडून जेडीएसच्या आमदारांना 100 कोटींची ऑफर - कुमारस्वामी
Continues below advertisement
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने, तिथे आता घोडेबाजार सुरु झाला आहे.
भाजपकडून जेडीएसच्या आमदारांना प्रत्येकी 100 कोटी रुपये आणि मंत्रिपदाचं लालूच दाखवलं जात आहे, असा गंभीर आरोप जेडीएस नेते एच.डी.कुमारस्वामी यांनी केला आहे.
ते आज बंगळुरुमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
"मला दोन्ही बाजूची ऑफर आहे. मात्र 2004 - 2005 मध्ये मी भाजपसोबत गेल्याने, माझ्या वडिलांच्या कारकिर्दीवर काळा डाग पडला. देवाने मला तो डाग पुसण्याची संधी दिली आहे. मी आता काँग्रेससोबत जाणार आहे", असं कुमारस्वामी यांनी सांगितलं.
याशिवाय तुम्हाला भाजपचे कर्नाटक प्रभारी प्रकाश जावेडकर भेटले होते का? या प्रश्नावर कुमारस्वामी म्हणाले, कोण जावडेकर? ते सदगृहस्थ कोण आहेत?
कुमारस्वामींनी कालच काँग्रेसच्या पाठिंब्यासह 116 आमदारांसकट सत्तास्थापनेचा दावा राज्यपाल वजुभाई वालांकडे केला आहे.