कर्नाटकचा सत्तासंघर्ष : येडियुरप्पांचा शपथविधी, काँग्रेसचं विधानभवनाबाहेर आंदोलन
Continues below advertisement
येडीयुरप्पांच्या शपथविधी सोहळ्यावरुन मध्यरात्री सुप्रीम कोर्टात झालेल्या ऐतिहासिक सुनावणीत काँग्रेसला झटका बसला. सुप्रीम कोर्टानं येडीयुरप्पांचा शपथविधी रोखण्यास स्पष्टपणे नकार दिला. राज्यपालांनी येडीयुरप्पांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण देताच काँग्रेसनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यामुळे चक्क रात्री सव्वा दोन ते तब्बल पहाटे साडे पाच पर्यंत कोर्टात ऐतिहासिक सुनावणी झाली. पण त्यात काँग्रेसची निराशा झाली आहे. पण आता काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला आणि कर्नाटक विधानसभेबाहेर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या, काँग्रेसचे नेते गुलाम नबी, अशोक गहलोतही इथं उपस्थित आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बहुमताचा 112 आकडा कोणालाही गाठता आला नाही. भाजप हा 104 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसला एकूण 78 आणि जेडीएस 38 जागा मिळाल्या आहेत
Continues below advertisement