कर्नाटक : भाजप सर्वात मोठा पक्ष, पण बहुमत नाही : सट्टेबाजांचा सर्व्हे

Continues below advertisement
कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत जशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, त्याचप्रमाणे सट्टेबाजांचा पैसाही पणाला लागला आहे. आतापर्यंत इथे निवडणुकीवर तब्बल 200 कोटींचा सट्टा लावण्यात आला आहे. इतर सर्व्हेंप्रमाणे सट्टेबाजांनीही कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही असा दावा केला आहे. सट्टेबाजांच्या दाव्याप्रमाणे भाजपला सर्वाधिक 92 ते 94 जागा मिळतील तर काँग्रेसला 89 ते 91 जागा मिळतील. तर यावेळी जेडीएस किंगमेकर असेल अशी हवा सट्टा बाजारात आहे. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांच्यावर सर्वाधिक पैसे लागले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram