कर्नाटकचा सत्तासंघर्ष : बहुमताआधीच येडियुरप्पांचा राजीनामा, भाजप सरकार पडलं
Continues below advertisement
कर्नाटकातलं येडियुरप्पा सरकार अवघ्या अडीच दिवसात कोसळलं. बहुमताच्या अग्निपरीक्षेला सामोरं जाण्याआधीच येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 104 चं संख्याबळ असलेल्या भाजपला 111 चा बहुमताचा आकडा गाठण्यात पूर्णपणे अपयश आलं. पुढच्या वेळी 150 पेक्षा जास्त जागा घेऊनच मी विधानसभेत परत येईन, असा दावा करत त्यांनी राजीनामा दिला. यामुळे भाजपचं आॅपरेशन लोटस पूर्णपणे फेल ठरलं.
Continues below advertisement