कौल कर्नाटकचा : कर्नाटकात नाट्यमय वळण, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसचा जेडीएसला पाठिंबा
Continues below advertisement
कर्नाटकमधला सत्तासंघर्ष नाट्यमय वळणावर पोहोचलाय... कर्नाटकच्या जनतेनं कुणाच्याही पारड्यात बहुमताचा कौल न दिल्यानं त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालीय...
104 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-जेडीएसनं हातमिळवणी केलीय. थोड्याच वेळात जेडीएसचे नेते कुमारस्वामी काँग्रेस नेत्यांची भेट घेणार आहेत... तर दुसरीकडे भाजपच्या गोटातही हालचालींना वेग आलाय..भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांच्या भेटीसाठी पोहोचलेत . काँग्रेस आणि जेडीएस राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत...दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या बदामीमध्ये जिंकले असून चामुंडेश्वरी मतदारसंघातून पराभूत झालेत....सध्याच्या स्थितीनुसार भाजप 104 , काँग्रेस 78 आणि जेडीएसच्या खात्यात 38 जागा आहेत...