कौल कर्नाटकचा : भाजप मोठा पक्ष; काँग्रेस, शिवसेना, मनसेचं ईव्हीएमवर खापर
Continues below advertisement
कर्नाटकात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर आता काँग्रेस, शिवसेना आणि मनसेने ईव्हीएमवर खापर फोडलं आहे. काँग्रेस नेते मोहन प्रकाश यांनी मतदार मतदान एका पक्षाला करत आहेत. आणि मतदान मात्र दुसऱ्याच पक्षाला होत असल्याचा आरोप केलाय. तर एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ईव्हीएम मशीनमुळे भाजपचा विजय झाला असल्याचं म्हटलं आहे.
Continues below advertisement