कौल कर्नाटकचा : आमच्याक़डे बहुमत, आम्हीच सत्ता स्थापन करु : गुलाम नबी आझाद
Continues below advertisement
कर्नाटकमधील सत्तासंघर्षात नाट्यमय घडामोडींना वेग आलाय. भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार येडियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तर बहुमत सिद्ध करण्यासाठी ८ दिवसांच्या अवधीची मागणी केली आहे. त्यापाठोपाठ जेडीएसचे नेते कुमारस्वामीही राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनात दाखल झाले. त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते सिद्धरामय्याही होते. त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसनं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी दावा केला आहे. ११८ आमदारांचं समर्थन असल्याचा विश्वासही त्यांनी सिद्धरामय्या यांनी व्यक्त केलाय. मात्र, आता राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
Continues below advertisement