कौल कर्नाटकचा : कर्नाटक 'काँग्रेसमुक्त', देशातील 21 व्या राज्यातही कमळ फुललं
Continues below advertisement
Karnataka election results 2018: कर्नाटक निवडणुकीनंतर काँग्रेसने आणखी एक राज्य गमावलं आहे. पंजाब हे एकमेव मोठं राज्य काँग्रेसच्या ताब्यात आहे. राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेसचा हा पहिलाच मोठा पराभव आहे. त्यामुळे राहुल गांधी पहिल्याच परीक्षेत नापास झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 मे रोजी प्रचारादरम्यान कर्नाटकातील शिमोगामध्ये केलेलं वक्तव्य खरं ठरलं. कर्नाटकच्या निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष केवळ पीपीपी म्हणजे पंजाब, पुद्दुचेरी आणि परिवार एवढाच उरणार आहे, असं मोदी म्हणाले होते.
कर्नाटक गमावल्यानंतर काँग्रेसच्या हातात आता मिझोराम, पंजाब आणि पुद्दुचेरी हे तीन राज्य उरले आहेत. व्होट शेअरवर नजर टाकली तर काँग्रेसचं सध्या केवळ 2.5 टक्के लोकसंख्येवर राज्य आहे. तर भाजप्रणित एनडीए कर्नाटक जिंकल्यानंतर 21 व्या राज्यातही सत्ता स्थापन करणार आहे. तर एनडीएचं एकूण 64.09 टक्के लोकसंख्येवर राज्य असेल.