कौल कर्नाटकचा : सत्तेसाठी भाजपची धावाधाव, येडियुरप्पा राज्यपालांची भेट घेण्यासाठी रवाना
Continues below advertisement
कर्नाटक निवडणुकीमध्ये सत्तासंघर्ष आता टोकाला गेला आहे... कारण भाजप आरामात सत्ता स्थापन करणार असं वाटत असतानाच, अचानक काँग्रेसने यात उडी घेऊन जनता दला सेक्यूलरला सत्तास्थापनेसाठी बिनशर्त पाठिंबा दिला आहे... आज निकाल लागल्यानंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेसने आपला पवित्रा स्पष्ट केला... त्यामुळे आता भाजपच्या वळचणीला असलेल्या जनता दलाने सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत..
भाजप 104 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तर बहुमतासाठी हव्या असणाऱ्या वरच्या 8 जागा त्यांना कमी पडतात. दुसरीकडे काँग्रेसला मोठा धक्का बसला असला, तरी फक्त भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी अवघ्या 37 जागा मिळालेल्या जनता दलाला पाठिंबा दिला आहे..
दुसरीकडे भाजप नेत्यांनीही सत्तेसाठी हालचाली सुरु केल्या असून कर्नाटकचे प्रभारी प्रकाश जावडेकर आणि भाजप नेते जे. पी. नड्डा हे अमित शाह यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत...