कर्नाटक : पक्षाने उमेदवारी न दिल्याने भाजप नेत्याला रडू कोसळलं

Continues below advertisement
कर्नाटकमधील गुलबर्ग्यात उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजप नेत्याला माध्यमांसमोरच रडु कोसळलंय..शशील नामोशी यांनी माध्यमांसमोरच आपल्या अश्रुंना वाट मोकळी करुन दिलीये. नामोशी हे अक्षरशः धाय मोकलुन रडत असल्यामुळे शेवटी पत्रकार परिषदच आटोपती घ्यावी लागली. कलबुर्गीमधून भाजपची उमेदवारी मिळेल अशी आशा नामोशींना होती. पण जेव्हा पक्षाने उमेदवारी जाहिर केली तेव्हा त्यांना मोठा धक्का  बसला. पक्षाने जाहिर केलेल्या दुसऱ्या यादीत त्यांचं नावच नव्हतं. हा धक्का त्यांना सहन झाला नाही. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. पण भावनिक झाल्यामुळे पत्रकार परिषद अर्धवट सोडून त्यांना जावं लागलं. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा झालीये त्यामुळे नेत्यांच्या नाराजीचा सामना प्रत्येक पक्षाला करावा लागतोय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram