कौल कर्नाटकचा : थुंका आणि पळून जा ही काँग्रेसची स्ट्रॅटेजी : जावडेकर
Continues below advertisement
मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर अवघ्या 55 तासात कर्नाटकातील भाजपचं सरकार पडलं. बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला. त्यामुळे कर्नाटकात आता काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार सत्तेवर येणार आहे. जनता दल सेक्युलरचे नेते कुमारस्वामी सोमवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल वजूभाई वाला यांच्या भेटीनंतर ही घोषणा करण्यात आली.
Continues below advertisement