Ekvira Devi | यूट्यूबवर एकवीरा मंदिराचा कळस 'सोन्याचा' भासल्याने चोरी, दोघे गजाआड | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
यूट्यूबवरील गाण्यात एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस सोन्याचा भासल्यामुळे चोरी करणाऱ्या चोरट्यांना अखेर अटक झाली आहे. तब्बल दीड वर्षांनंतर दोघा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. राहुल गावंडे आणि सोमनाथ गावंडे यांनी लोणावळ्याजवळील कार्लागडावरील एकवीरा मंदिराचा कळस चोरला होता. यूट्यूबवरील गाण्यात एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस सोन्याचा दिसत असल्याने आरोपींनी कळस चोरी करण्याचा डाव आखला. त्यानुसार तीन ऑक्टोबर 2017 रोजी त्यांनी कळसाची चोरी केली.