लोणावळा : कार्ल्यातील एकविरा देवीच्या मंदिराचा कळस चोरीला
जागृत देवस्थान अशी ओळख असलेल्या कार्ल्यातील एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस चोरी झाला आहे. मध्यरात्री ही चोरी झाल्याची माहिती आहे. कळसाना सोन्याचा मुलामा दिला होता. त्याची किंमत सव्वा लाख रुपये होती. एका भक्तानं हा कळस दान केला होती. अशी माहिती एकवीरा देवी मंदिराचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते अनंत तरे यांनी दिलीय. या मंदिर परिसरात सीसीटीव्ही आहेत. त्यामुळे सीसीटीव्हीच्या मदतीनं चोरट्यांचा शोध घेण्याचं काम सुरु आहे. एकवीरा देवीसाठी मुंबई ठाण्यातून अनेक भाविक दरवर्षी दर्शनाला जात असतात. ठाकरे कुटुंबाचं ते कुलदैवत आहे.