कर्जत : मुसळधार पावसाने कर्जत स्टेशनवर रुळ पाण्याखाली
मुंबई, ठाणे आणि आजुबाजुच्या परिसरात पावसाची संततधार सुरुच आहे. ठाणे आणि रायगड परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. मध्य रेल्वेची कर्जत आणि कल्याण दरम्यानची रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. कर्जत आणि विठ्ठलवाडीजवळ रेल्वे रुळावर पाणी साचल्याने कर्जतकडून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा ठप्प झाली आहे.