उस्मानाबाद : करजखेडा गावात नवस फेडण्यासाठी मुलांना मंदिरावरुन फेकण्याची प्रथा
Continues below advertisement
नवस फेडण्यासाठी लहान मुलांना मंदिराच्या शिखरावरुन झोळीत टाकण्याचा प्रकार तुळजापूर जवळच्या गावातल्या जत्रेत दरवर्षी घडतो. इथल्या करजखेडा गावात दरवर्षी खंडोबाची यात्रा भरते. या यात्रेत नवसानं झालेली मुलं मंदिराच्या शिखरावरुन फेकली जातात. आणि ती खाली एका चादरीत झेलली जातात. यंदाही 1 वर्षापासून ते 5 वर्षे वयापर्यंतची 35 लहान मुलं शिखरावरुन झोळीत टाकली गेली. खंडोबाचा नऊ दिवसाचा उपवास संपल्यानंतर दहाव्या दिवशी ही यात्रा भरते. यावेळी बगाड्यांची मिरवणूक निघते. त्यानंतर या प्रकाराला सुरुवात होते.
Continues below advertisement