साडेचार कोटींसह नि. अधिकाऱ्याचं अपहरण, पाठलाग करुन आरोपींना पकडलं
Continues below advertisement
कराडमधून माजी उपअधीक्षकाचं अपहरण करुन तब्बल साडे चार कोटी रुपये पळवणाऱ्या टोळीला मोठ्या थराराअंती कैद करण्यात आलं आहे. मुंबई-गोवा महामार्गावर अनेक किलोमीटरपर्यंत रत्नागिरी पोलिसांनी पाठलाग करुन या टोळीला जेरबंद केलं आणि रोकडही जप्त केली. काल दुपारी कर्नाटकच्या ज्ञानयोगी श्री शिवकुमार स्वामीजी शुगर कारखान्याची काही मंडळी ऊस हंगामाच्या करारासाठी कराडमध्ये आली होती. त्यांनी व्यवहारासाठी तब्बल साडे चार कोटी रुपये सोबत आणले होते.
Continues below advertisement