नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचा दिग्गज क्रिकेटर्सकडून समाचार

Continues below advertisement
जम्मू-काश्मीरमध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या १३ दहशतवाद्यांचा पुळका पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला आला होता. त्याने ट्विटरवरून भारताकडून करण्यात आलेल्या कारवाईविरोधात गरळ ओकली होती... पण आता आफ्रिदीविरोधात भारतीय दिग्गज खेळाडूंची फळी उभी राहिली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार कपिल देव आणि सचिन तेंडुलकरनं आफ्रिदीची बोलतीच बंद केली आहे. काश्मीर मुद्द्यावरून आफ्रिदीनं संयुक्त राष्ट्रासोबत इतर आंतरराष्ट्रीय संघटनांवरही ट्विटरच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र आफ्रिदीला गौतम गंभीर आणि सुरेश रैनानं चांगलंच खडसावलं. यानंतर आफ्रिदी चांगलाच ट्रोल झाला. दरम्यान आता दिग्गज खेळाडूंनीही आफ्रिदीवर निशाणा साधला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram