बीड : खोदकाम करताना मूर्ती सापडल्यानंतर भाविकांच्या भावनेशी खेळ

Continues below advertisement
देऊळ या मराठी चित्रपटात ज्याप्रकारे भक्तीचा बाजार दाखवण्यात आला होता, तसाच काहीसा प्रकार मूर्ती सापडलेल्या कण्हेरवाडीत सुरु झाला आहे. खोदकाम करताना याठिकाणी काल एक मूर्ती सापडली होती त्या मूर्तीच्या दर्शनासाठी आता भाविकांची आता चांगलीच रिघ लागली आहे.त्याचबरोबर आजूबाजूला दुकानंही थाटली गेली आहेत. खोदकाम करताना लोकांना ही मूर्ती सापडली. आणि मूर्ती शेजारी जीवंत नाग असल्यामुळे गावकऱ्यांनी ही मूर्ती म्हणजे स्वयंभू शंकर आहेत असं नामकरण केलं. मंगळवारी दुपारी तर इथं शे- पाचशे लोकांच्या उपस्थितीत कीर्तनाचा कार्य़क्रमही पार पडला. अवघ्या काही तासात इथं फुलं आणि अगरबत्त्यांचा घमघमाट सुटला. लोक या मूर्तीचं दर्शन घ्यायला थेट 50 - 50 किलोमीटर वरून येत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram