मुंबई : कांदिवलीत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या
मुंबईतील कांदिवली पूर्व भागात एका 14 वर्षीय मुलींन इमारतीच्या 8 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. हर्षिता मायावंशी असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे. हर्षिता रोजप्रमाणे आपल्या शाळेत गेली आणि परतल्यावर तीने जवळच्याच ऑर्चिड या इमारतीच्या ८ व्या मजल्यावरुन उडी मारली. बाजूच्या इमारतीमधील काही लोकांनी तिला आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हर्षिताने त्यांच ऐकल नाही. गुरुवारी दुपारी ४ च्या दरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हीडिओही समोर आलाय. दरम्यान, याप्रकरणी समतानगर पोलिस पुढील तपास करत आहेत. मात्र, हर्षिताने आत्महत्या का केली हे अद्याप समोर आलं नाही.