स्पेशल रिपोर्ट : कांदिवलीतील रायन स्कूलचं वास्तव 'माझा'च्या कॅमेऱ्यात
Continues below advertisement
गुरूग्राममधल्या रायन स्कूलमध्ये 7 वर्षांच्या प्रद्युम्नची हत्या झाल्यानं देशभर खळबळ उडाली आहे. यापेक्षाही आणखी धक्कादायक बाब म्हणजे मुंबईच्या कांदिवलीत असलेल्या याच रायन स्कूलची सुरक्षाही रामभरोसेच असल्याचं समोर आलं आहे. कारण मुख्य प्रवेशद्वार सोडलं तर इतरत्र कुठेचं सुरक्षारक्षक नसल्याचं आढळून आलं. याशिवाय स्कूल बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर्सना कायमस्वरूपी ठेवण्यात आलं नसून त्यांच्याकडे ओळखपत्र नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पालकांकडून मोठी फी उकळणारी रायन स्कूल विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी किती हलगर्जीपणा बाळगते हे आता उघड झालंय.
Continues below advertisement