मुंबई : कमला मिल अग्नितांडव प्रकरण : विशाल कारिया अटकेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jan 2018 11:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कमला मिल कंपाऊंड अग्नितांडवप्रकरणी पोलिसांनी विशाल करिया नावाच्या व्यक्तीला अटक केलीय. त्याच्याकडून 'वन अबव्ह' पबचा फरार पार्टनर अभिजीत मानकरची कार त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आली आहे. 'वन अबव्ह'च्या तीन मालकांपैकी एक अभिजीत मानकर आगीच्या घटनेनंतर फरार आहे. मात्र त्याची कार विशाल कारियाकडे मिळून आली. ही कार त्याच्याकडे कशी आली याबाबत त्यानं समानधानकारक उत्तर न दिल्यानं पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली. शिवाय त्याची चौकशी केली असता त्याने ओळख लपवण्याचा प्रयत्न केला.