कल्याण : प्लास्टिक ग्लासचा वापर, मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात प्लास्टिकबंदीला केराची टोपली
Continues below advertisement
राज्यात प्लॅस्टिक बंदी लागू केली असतानाही मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातच काल प्लॅस्टिकचे ग्लास वापरण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. राज्य सरकारच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या १३ कोटी वृक्षलागवडीच्या उपक्रमाचं काल कल्याणच्या वरप गावात उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री, पालकमंत्री, राज्यमंत्री यांच्यासह अनेक आमदार खासदार उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना पाणी वाटण्यासाठी बंदी असलेले प्लॅस्टिकचे ग्लास देण्यात आले. त्यामुळे आता आयोजकांबरोबरच ते ग्लास वापरणाऱ्या नेत्यांकडून दंड वसूल केला जाणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय.
Continues below advertisement