Kalyan Police | कल्याणमध्ये गाड्यांच्या काळ्या काचांवर पोलिसांची कारवाई | ABP Majha

Continues below advertisement



कल्याण शहरात बेशिस्त वाहनचालकांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केलीये. याचाच एक भाग म्हणून काळ्या काचांच्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली. पत्रीपूल परिसरात सकाळच्या सुमारास वाहतूक पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी सापळा रचला. काळ्या फिल्म लावलेल्या गाड्या थांबवत या फिल्म अक्षरशः फाडून टाकल्या. या कारवाईमुळे धास्तावलेले अनेक वाहनचालक काचा खाली करून गाड्या चालवताना दिसले. कल्याण शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला होता, तसंच वाहनचालकांचा बेशिस्तपणाही वाढला होता. या सगळ्याला गेल्या काही दिवसांपासून आळा घालण्याचं काम वाहतूक पोलिसांनी हाती घेतलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram