Kalyan Shiv Sena | शिवसेनेनं अचानकपणे कल्याण ग्रामीण मतदारसंघाचा उमेदवार बदलला | ABP Majha
Continues below advertisement
कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेनं अचानकपणे उमेदवार बदलला आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना एबी फॉर्म दिला होता. मात्र आज अचानक नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पक्षाने एबी फॉर्म देत खळबळ उडवून दिली. विद्यमान आमदार सुभाष भोईर यांच्याविरोधात ग्रामीण भागात मोठी नाराजी होती. कालच ६३ गावांतील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे देत बंडाचा इशारा दिला होता. त्यानंतर आज दुपारी आज अचानक खासदार श्रीकांत शिंदे हे रमेश म्हात्रे यांना घेऊन डोंबिवलीत आले आणि पक्षाने म्हात्रे यांना अधिकृत उमेदवारी दिल्याची घोषणा केली. त्यामुळे आता सुभाष भोईर यांचा पत्ता पक्षाने कट केल्याचं स्पष्ट झालं आहे.
Continues below advertisement