कल्याण : चोरीला गेलेले 186 मोबाईल पोलिसांकडून मूळ मालकांना परत
Continues below advertisement
एकदा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल परत मिळण्याची आशा आपण सोडून देतो, मात्र कल्याण पोलिसांमुळे मूळ मालकांना आपले मोबाईल मिळाले आहेत. कल्याण आणि उल्हासनगर परिसरातून चोरीला गेलेले तब्बल 186 मोबाईल पोलिसांनी मूळ मालकांना परत केले. तब्बल 22 लाख रुपयांचा हा मुद्देमाल समारंभपूर्वक परत करण्यात आला. पोलिसांच्या संयुक्त पथकानं 19 मोबाईलचोरांना अटक करत त्यांच्याकडून 186 मोबाईल जप्त केले. हे मोबाईल परत करण्यासाठी कल्याणात पोलिसांच्या वतीनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
Continues below advertisement