झाडांच्या जाळपोळीनंतर खासदार श्रीकांत शिंदेंचा संताप | कल्याण | एबीपी माझा
हजारो लोकांनी कष्टाने लावलेल्या झाडांचा साधा सांभाळ देखील वनविभागाला करता येणार नसेल तर 50 कोटी झाडे लावण्याचे लक्ष्य कसे पूर्ण करणार? असा थेट सवालच शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी विचारला. सरकारच्या वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत लावलेली हजारो झाडं आगीत जळून खाक झाली याचपार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांनी फेसबुक पोस्ट करत घटनेचा निषेध व्यक्त केला.