कल्याण : खड्ड्यांना पाऊसच जबाबदार, केडीएमसीचा जावईशोध
Continues below advertisement
खड्ड्यांमुळे कल्याण-डोंबिवलीवलीकर जिवंतपणी मरणयातना सोसतायेत. या खड्ड्यांनी आतापर्यंत 5 जणांचा बळी घेतलाय. मात्र, केडीएमसी महापालिका प्रशासनाने जावईशोध लावत रस्त्यांवरील या खड्ड्यांना पाऊसच जबाबदार असल्याचं म्हटलंय. अतिवृष्टीमुळे रस्त्यावर खड्डे पडले असून अपघात टाळण्यासाठी गाड्या हळू चालवाव्यात अशा सूचनांचे फलक शहरात लावले आहेत. मात्र हा प्रकार म्हणजे निर्लज्जपणाचा कळस असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होतेय. दरम्यान, 3 दिवसांपूर्वी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील खड्डे तातडीने भरण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही कल्याण शहरातल्या अनेक प्रमुख रस्त्यांवर अजूनही खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय.
Continues below advertisement