कल्याण : महापालिकेतील सर्वांच्या सुट्ट्या रद्द, खड्डे बुजवण्याचे आदेश
Continues below advertisement
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावल्यानंतर पालिकेला जाग आलीय. शहरातील रस्त्यांवरचे सर्व खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेचे अभियंते आणि प्रभाग अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवा असे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिलेत. आज एकनाश शिंदे यांनी कल्याण शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी केली. त्यावेळी रस्त्यावरच शिंदे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलच फैलावर घेतलं. त्यानंतर आयुक्तांनी सुट्टी रद्द करत दोन दिवसात खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत.
Continues below advertisement