कल्याण: 'शिळफाटा रस्त्याची दूरवस्था केडीएमसीमुळेच'
Continues below advertisement
डोंबिवलीहून शिळफाट्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था एबीपी माझानं समोर आणली. काटई टोलनाका परिसरातल्या खड्ड्यांनी ट्रॅफिक जाम आणि वाहनचालकांची अडचण होतेय. पण या खराब रस्त्यांना कल्याण-डोंबिवली मनपाच जबाबदार असल्याचं पुढे आलंय. या भागात केडीएमसीची पाण्याची पाईपलाईन लिकेज असून त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती केली, तरी पुन्हा रस्ता खराब होत असल्याचा दावा एमएसारडीसीने केलाय. याबाबतचं पत्रही एमएसआरडीसीने केडीएमसीला दिलं असून ते 'माझा'च्या हाती लागलंय. या पत्रामुळे केडीएमसीच्या भोंगळ कारभाराची पोलखोल झालीए. पाणीपुरवठा विभागाला दुरूस्तीचे आदेश दिल्याचं स्पष्टीकरण महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिलंय
Continues below advertisement