कल्याणमध्ये खड्डे बुजवण्यासाठी चिखलाचा वापर, खासदार श्रीकांत शिंदेंकडून ठेकेदाराची पोलखोल

Continues below advertisement

कल्याणमध्ये खड्डे भरण्यासाठी पालिकेच्या ठेकेदाराकडून चिखल आणि निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर होत असल्याची बाब समोर आली आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी रस्ते दुरुस्ती सुरु असलेल्या ठिकाणाला अचानक भेट देऊन हा प्रकार उघडकीस आणला. कल्याण पूर्वेकडच्या चक्कीनाका परिसरात खड्ड्यांमुळं रस्त्याची चाळण झाली आहे. पालिका ठेकेदारांकडून खड्डे बुजवण्याचं काम सुरु आहे. यावेळी खासदारांनी केलेल्या पाहणीत अत्यंत निकृष्ट दर्जाचं साहित्य खड्डे बुजवण्यासाठी वापरलं जात असल्याची बाब उघड झाली. त्यामुळं खासदारांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रशासनावर चांगलीच आगपाखड केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram