कल्याण : केडीएमसीच्या तिजोरीत खडखडाट असताना प्रशासनाकडून महागड्या टॅबचा घाट
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नगरसेवकांसाठी टॅब खरेदी करण्याचा घाट सध्या केडीएमसी प्रशासनाने घातला आहे. यासाठी प्रशासनाकडून 25 लाखांचा वायफळ करण्यात येणार आहे. प्रत्येकाकडे महागडे स्मार्टफोन असताना टॅब हवेतच कशाला? असाही प्रश्न विचारला जातो आहे. महापालिकेच्या सूचना, अजेंडा, प्रस्ताव आणि ठराव या गोष्टी सॉफ्ट कॉपी स्वरुपात नगरसेवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या टॅबचा उपयोग होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पण या टॅब खरेदीला मनसेने विरोध केला असून त्यासंदर्भातलं निवदेन प्रशासनाला दिलं आहे.