ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त पी. वेलारासूंची बदली

Continues below advertisement
औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त दीपक मुगळीकर यांची बदली झाली आहे. तर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी. वेलारासू यांचीही बदली करण्यात आली आहे. दोन्ही महापालिका आयुक्तांना आपापल्या पालिका क्षेत्रातील कचरा प्रश्न भोवल्याची चिन्हं आहेत.

29 दिवसांनंतरही औरंगाबादेतील कचरा प्रश्न कायम आहे. मुगळीकरांना वैधानिक विकास महामंडळाचं सचिवपद देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

कचराकोंडीवरुन विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर औरंगाबादचे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सभागृहात याची घोषणा केली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram