केडीएमसीच्या सहा डॉक्टरांचा सामूहिक राजीनामा | कल्याण | एबीपी माझा
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात कार्यरत असलेल्या ६ डॉक्टरांनी सामूहिक राजीनामे दिलेत. डॉक्टरांची अपुरी संख्या आणि कामाचा प्रचंड ताण, यामुळं हे राजीनामे देण्यात आलेत. कल्याण आणि डोंबिवली शहरात महापालिकेची दोन रुग्णालयं असून त्यात सध्या 36 डॉक्टर कार्यरत आहेत. 1996 साली दोन्ही शहरांची लोकसंख्या २ लाख असताना शहरातल्या रुग्णालयांमध्ये 115 डॉक्टरांची पदं मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर आता 2018 मध्ये ही लोकसंख्या 9 पटींनी वाढून 18 लाखांवर गेली आहे. त्या तुलनेत डॉक्टरांची मंजूर पदं वाढवणं तर दूर, पण 1996 साली मंजूर असलेल्या 115 पदांपैकीही तब्बल 79 पदं सध्या रिकामी आहेत