कल्याण: दोन वेण्या न घातल्याने विद्यार्थिनीला मारहाण
Continues below advertisement
कल्याणमध्ये शाळेत येताना दोन वेण्या आणि कॅनव्हासचे शूज घातले नाहीत, म्हणून मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. कल्याणच्या टिळक चौक भागात असलेल्या ओक हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला.
आठवीत शिकणारी भक्ती म्हात्रे ही विद्यार्थिनी काल शाळेत येताना एक वेणी आणि चप्पल घालून आली. शाळा सुरु असताना मुख्याध्यापिका मेधा कुलकर्णी वर्गात राऊंडला आल्या आणि नियम न पाळणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून त्यांनी दोन-दोन छड्या मारल्या.
मात्र यामुळे भक्ती म्हात्रे या विद्यार्थिनीचे हात सुजले आणि तिला त्रास सुरु झाला. यानंतर तिच्या वडिलांनी थेट बाजारपेठ पोलिस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी मुख्याध्यापिका मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....