कल्याण : नवविवाहित जोडप्याने वाटलेल्या पेढ्यातून 34 जणांना विषबाधा
नवविवाहित जोडप्याने वाटलेले पेढे खाल्ल्यामुळे 34 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुरबाड-शहापूर रस्त्यावरील आदिवासी पाड्यात हा प्रकार घडला. मुरबाड-शहापूर रस्त्यावर संगम पाडा नावाचा आदिवासी पाडा आहे. जवळच दोन नद्यांच्या संगमावर शंकराचं मंदिर आहे. या मंदिरात काल पुण्याच्या एका जोडप्याने लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी जवळच्याच संगम पाड्यातल्या ग्रामस्थांना पेढे वाटले आणि निघून गेले.