कल्याण: महिला आरपीएफला रिक्षाचालकाची धक्काबुक्की
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कल्याण स्टेशनमध्ये महिला आरपीएफ जवानाला धक्काबुक्की करण्यात आलीये. नो एंट्रीत घुसलेल्या रिक्षाचालकाला अडवल्यामुळे त्यानेच ही धक्काबुक्की केलीये. इतकच नाही तर त्याने महिला जवानाचा हात सुद्धा पिरगाळलाय. यावेळी महिला जवानाने मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर रेल्वे पोलिसांनी या दोन्ही रिक्षाचलकांना पकडलं. पण इतकं घडून सुद्धा काही वेळाने या रिक्षाचालकांना सोडून देण्यात आलंय. यामुळे सर्वसामान्य महिला तर सोडा पण महिला जवान सुद्धा सुरक्षित नसल्याचं अधोरेखित झालंय.