बंद असलेल्या वालधुनीच्या पुलावरुन वाहतूक सुरुच | कल्याण | एबीपी माझा
पूल धोकादायक असल्याचा फलक लावूनही पुलावरून सर्रास वाहतूक सुरू आहे.
कल्याणच्या वालधुनीचा पूल जीर्ण झाला असून दुरूस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आलाय. पूल बंद असल्याचे फलक दोन्ही बाजुला लावल्यानंतरही काही प्रवासी याच पुलावरून वाहतूक करतायत.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलिस यांना माहिती देण्यात आली, मात्र त्याकडेही दुर्लक्ष होतंय.
कल्याण-उल्हासनगरला जोडणारा हा महत्वाचा पूल असल्यानं इथं मोठ्या प्रमाणात रहदारी असते. मात्र अंधेरी आणि सावित्री पूल दुर्घटना झाल्यानंतरही कोणत्याच खबरदारी घेतल्या जात नसल्यानं चिंता व्यक्त होते.