कल्याण : बीएसयूपी घरांच्या ताब्यावरुन दोन गटात तुफान हाणामारी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कल्याणमध्ये बीएसयुपी घरांच्या ताब्यावरुन दोन गटांत तुफान हाणामारी झाली. महापालिका मुख्यालयाबाहेर पोलिसांसमोरचं 15 ते 20 मिनीटं हा प्रकार सुरु होता. या हाणामारीत 4 ते 5 जण जखमी झालेल्याचं कळतंय. इंदिरा नगरमध्ये असलेल्या बीएसयुपी प्रकल्पाची 15 घरे पालिका प्रशासनाने साठे नगरच्या रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात दिली आहे. साठेनगर मधील हे रहिवासी घराचा ताबा घेण्यासाठी बिऱ्हाडसह गेले. मात्र आधीपासूनच इंदिरानगरातील रहिवाशांनी इमारतीच्या मुख प्रवेशद्वाराला कुलूप ठोकलं. यावरूनचं दोन्हीकडच्या लोकांमध्ये राडा झाला.