Assembly Election 2019 | शिवसेनेला जागा सोडल्याने नाराज, नरेंद्र पवार अपक्ष निवडणूक लढवणार | ABP Majha
Continues below advertisement
पक्षाला दिलेल्या अल्टिमेटमचीही दखल न घेण्यात आल्यानं भाजप आमदार नरेंद्र पवार अपक्ष लढणार आहेत. ऐरोलीच्या बदल्यात शिवसेनेला कल्याण पश्चिमची जागा दिल्यानं विद्यमान भाजप आमदार पवार यांची गोची झाली. काल या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत आज दुपारपर्यंत निर्णय घेण्याचा इशारा दिला होता. मात्र त्याची दखलच घेतली न गेल्यानं आपण अपक्ष लढणार असल्याचं भाजप आमदार नरेंद्र पवारांनी म्हटलं आहे. 4 तारखेला सकाळी 10 वाजता अर्ज भरणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
Continues below advertisement