कल्याण : अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांची एसीबीकडून चौकशी सुरु
Continues below advertisement
केडीएमसीचे वादग्रस्त अतिरिक्त आयुक्त संजय घरत अडचणीत येण्याची शक्यता आहे. घरत यांच्या कार्यकाळात अनेकदा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, तसंच त्यांनी पालिकेत सादर केलेल्या मालमत्तेच्या विवरणपत्रात खरी माहिती लपवल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यानुसार एसीबीनं त्यांची चौकशी सुरु केली असून केडीएमसीकडूनही घरत यांच्याबाबत माहिती मागवण्यात आली आहे. सुलेख डोन यांनी घरत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.
Continues below advertisement