कल्याण : डॉक्टरच्या क्रूरतेचा कळस, परदेशी जातीच्या 9 कुत्र्यांना दयनीय अवस्थेत डांबलं
Continues below advertisement
माणुसकीला काळीमा फासणारी घटना कल्याणमध्ये समोर आलीय. एका डॉक्टरने परदेशी जातीच्या तब्बल 9 कुत्र्यांना अत्यंत दयनीय अवस्थेत आपल्या घरात डांबून ठेवलं होतं. कल्याणच्या गोदरेज हिल परिसरात डॉक्टर विरेंद्रपाल सिंग याचा मोठा बंगला आहे. या बंगल्यात अनेक कुत्र्यांना अत्यंत क्रूरतेने डांबून ठेवल्याची माहिती वाशीतील एनजीओचे कार्यकर्ते चेतन रामानंद शर्मा यांना मिळाली होती. चेतन शर्मा यांनी याबाबत खडकपाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधत या बंगल्यात जाऊन पाहणी केली.त्यावेळी अत्यंत देखणे आणि सर्वात महागडे समजले जाणारे परदेशी जातीचे 9 कुत्रे अत्यंत हलाखीच्या आणि मरणासन्न अवस्थेत असल्याचे दिसून आले.या कुत्र्यांमध्ये 3 सायबेरीयन हस्की,1 डोंगो अर्जेंटिनो, 1सेंट बर्नार्ड, 3 गोल्डन रेटव्हीवर,1 फ्रेंच मॅस्टीफ अशा विविध प्रजातींचा समावेश आहे.या सर्व कुत्र्यांची सुटका करुन चेतन शर्मा यांच्या तुर्भे येथील केंद्रात त्यांना हलवण्यात आलं आहे. याप्रकरणी डॉक्टर विरेंद्रपाल सिंगवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Continues below advertisement