कल्याण : क्लासला निघालेल्या 11 वर्षीय मुलाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
सायकलवरुन क्लासला निघालेल्या एका 11 वर्षीय मुलाचा ट्रकखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. जेसलीन कुट्टी असं मृत मुलाचं नाव आहे. जेसलीन काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास सायकलवरुन क्लासला जाण्यासाठी निघाला. मात्र कर्णिक रोडवरच्या घराच्या चौकातच तो ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला. जिथे हा अपघात झाला, तिथे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळापासून रस्त्याचं काम सुरु होतं आणि त्यामुळेच हा अपघात झाल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे.