ठाणे : कळव्याच्या महापारेषण सबस्टेशनमध्ये पुन्हा स्फोट
कळव्याच्या महापारेषण सबस्टेशनमध्ये आज सकाळी पुन्हा एकदा स्फोट होऊन आग लागली. ही आग पावसामुळे लागल्याची प्राथमिक शक्यता आहे. विद्युत कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निरोधक यंत्रणेच्या माध्यमातून ही आग विझवली. मात्र यामुळे वीजपुरवठ्यावर काही परिणाम झालाय का? हे अद्याप समजू शकलेलं नाही. याबाबत आम्ही महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही.